Thursday, August 13, 2009

कहाणी सूर्याची

कहाणी सूर्याची सुरेश हे त्याच नाव. पण सगळे त्याला सुर्या ह्या नावानेच हाक मारायचे. तस पाहिल तर सुर्या हा एक साधा नी गरीब (मानाने आणि पैशाने). पण सूर्याला त्याच ना घेण ना देण. प्रतेक वेळी तसच असते ... असो ... तर हा सुर्या एक मोठ्या गावा जवळच्या छोट्याशा वस्तीत राहाणारा. शरिराने तसा काटकुला, उंची जेमतेम. शाळा १ मैल लांब होती. अंतर जास्त नसले तरी त्या बारीक पावलांना जास्तच वाटायचे. का कोण जाणे पण याला शाळेत जायला आवडाचे. कारण याला शाळा आवडायची का घरचे काम करावे लागणार नाही म्हणून हे सांगणे जरा कठीण. तर आसा हा सुर्या दररोज त्याच्या वजनायच्य दुप्पट दप्तर घेऊन शाळेला जाई. ईतर पॉरांसारखेच ... त्याला गोष्टीची पुस्तके वाचायला खूप आवडे. शाळे तून दर आठवड्याला एक तरी पुस्तक घेणारच. ते पुस्तक हळूच बालभारती किंवा इतिहासाच्या पुस्तकात घालून वाचत बसे. जर आई ला कळले तर खैर नाही. दुसरी आवडती गोष्टा म्हणजे बकरू. सकाळ-संध्याकाळ केन्वहि याला पहा, हा बाकर्‍याला जवळ घेऊन बसलेला. त्याच्याशी बोलणार, त्याला गोंजार्णार. घरी जेवड्या शेळ्या आहेत त्या सगळयांचे नामकरण ह्यानेच केलेले. मग एखादे नवे बकरू आले की त्याचे पण नामकरण हाच करणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे - भारतातील सगळ्यात पॉप्युलर गेम -क्रिकेट. मॅच सुरू झाली की हा दिवसभर तिथेच पडून. मॅच आसेल तर मग रात्रीचे दिवस करून पाहणार. आई ने कितीही शिव्या घातल्या तरी याला काही नाही. कितेक वेळा चोप पण बसलाय साहेबांना. तर आसा हा सुर्या भविष्याची चिंता न करणारा, आपल्याच विश्वात रंगणारा ... to be continued

No comments:

Post a Comment