Wednesday, October 21, 2009

कहाणी सूर्याची -२ - गोट्या


गोट्या, सुर्या चा चुलत चुलत भाऊ. शाळेत गोट्या सूर्याच्या एक इयत्ता पुढे शिकायला होता. तसा हा गोट्या सूर्याचा जिवश-कंठष मित्र नाही. पण ह्याने त्याला खूप काही शिकवले. हा गोट्या शाळेत हुशार नसला तरी खूप चॅप्टर. नी जनरल नालेज भरपूर. त्याने सूर्याला क्रिकेट मधे इण्टरेस्ट बनवला. त्याच झाल आस की हा गोट्या ५ - ६ वर्षे मामाच्या गावाला राहायला होता तिकडे त्याचाय मामाकडे TV होता. तिथे त्याला मॅच पाहायचा चासका लागला. पण त्याच्या घरी TV नव्हता. तो होता सूर्याच्या घरी - कासका पण आसेना पण त्या वस्तीवारल्या बोटावर मोजण्या ईतक्या लोकांकडे होता. असो. सांगायचा मुद्दा म्हणजे सूर्याला त्यावेळी क्रिकेट मधे इंट्रेस्ट ह्या गोट्या ने आणला. मग त्यालपण मॅच पाहायला मिळणार.

तसा हा गोट्या भलताच क्रियेटिव. पण सल्याला दुनिया भाराचा कंटाळा. पण जर त्याचा इंट्रेस्ट आसेल तर मात्र भलताच इंट्रेस्ट घेणार. ज्वारीच्या चिपडपासून गाड्या भारी बनवायचा. त्याला बोद्धहिबलाची आवड. इथे वस्तीवर काय पूर्ण गावात बुद्धिबळ (चेस) मिळणे आव्हगड. परत चेस खेळणारे कोण ? सगळे बैठे खेळामधे चंफल, सागर्गोटे, पत्ते वैगरे खेळणारे. मग परत ह्याने सूर्याला पकडला. सुर्या खेळायला तर तयार झला पण चेस आणणार कोठून ? पण हा गडी हार मानणारा नव्हता. त्याने ठरवले की चिपडपासून चेस च्या "सोन्ग्ट्या" बनवायच्या. आणि त्याने बनवल्या. आणि चेस बोर्ड म्हणून पद. त्या पद वर ८*८ ची घरे बनवली - लाईन मारायला कोळसा. शेवटी झाला चेस बोर्ड तयार. पण सोन्ग्ट्या हावेने उदायची भीती ... मग गोड्याटली एक अंधर्या खोलीत आम्ही चेस खेळायला जायचो. सूर्याला तर रूल्स माहीत नाही. जे गोट्या शिकवणार तेच रूल्स आणि त्याला पण आर्धे रूल्स माहीत नाही. एका दिवशी हा तर दुसर्या दिवशी दुसरा रुल. गोट्या चे पाहून सुर्या चेस शिकायला लागला. मग पुढे तो गोट्याला हारवायला पण लागला. जसा सुर्या चांगले चेस खेळायला लागला तशी गोट्याचि चीटिंग वाढू लागली.

तर आसा हा गोट्या भरपूर हुशार पण आपला हुशारी पणा चुकीच्या जागी वापरात राहिला. आजूनही साहेब तोच धडा गिरवतोय. तर आसा हा गोट्या भरपूर हुशार पण आपला हुशारी पणा चुकीच्या जागी वापरात राहिला. लहान मुलांच्या खोड्या (रॅगिंग) काढणे, मोठ्यांची नकला करणे नि बरोबरच्या टवाळक्या मित्रांना हसवणे हे सोडून शाळेत काही नाही केले. १०वि कशीबशी चीटिंग करून पास झाला. पण काहीही आसो ह्याला कधी उदास नाही पहिले. जगायचे खूप प्रकार आसतात. काहींच्या पथ्यावर ते पडते तर काही ते मुद्दाम स्वीकारतात. हा बहुतेक २र्‍या कॅटागरी मधला आसवा ... to be continued ...

No comments:

Post a Comment